गर्भसंस्कार कोणत्या महिन्यापासून सुरू करावं?

तुम्ही गरोदर आहात आणि गर्भसंस्कार सुरू करण्याच्या विचारात आहात. तर ते सुरू करण्याची पहिली योग्य वेळ ही कालच होती आणि हे संस्कार सुरू करण्याची दुसरी वेळ आता आहे.
त्या प्रश्नाचं तुम्हाला मी अजून सोपं उत्तर सांगतो. ज्या क्षणी तुम्हाला गर्भधारणा झाल्याची म्हणजेच आपण प्रेग्नेंट असल्याची खात्री होते त्या क्षणी लगेचच तुम्ही गर्भसंस्कार सुरू करू शकता.
आणि जर कोणत्याही कारणामुळे तुम्हाला गरोदरपणाच्या सुरुवातीपासून हे संस्कार सुरू करता आले नसतील तर ते तुम्ही आत्ता लगेच सुरू करू शकता. गरोदरपणाच्या कोणत्याही महिन्यांमध्ये तुम्हाला हे संस्कार सुरू करता येतात. महत्त्वाचा आहे ते म्हणजे लवकरात लवकर सुरू करणे.
गर्भसंस्कार हे एक प्राचीन वैदिक शास्त्र आहे ज्याद्वारे होणारे बाळ आईच्या पोटात वाढत असतानाच त्याचा बौद्धिक, आध्यात्मिक आणि भावनिक विकास होण्यास मदत होते.
हे फक्त होणाऱ्या बाळासाठी चांगले नाही तर हे संस्कार गरोदर स्त्रीच्या मातृत्वाचा अनुभव सुखद आणि आनंदी तर बनवण्याबरोबर स्त्रीला गरोदरपणाचे हे नऊ महिने तिच्या जीवनातील आनंदी, निरोगी आणि सकारात्मक कालावधी असल्याचा अनुभव देते.
या संस्कार विषयी अधिक माहिती घेण्यापूर्वी आपल्याला प्रथमतः गर्भ आईच्या पोटामध्ये कसा वाढतो याची माहिती घ्यावी लागेल.
पहिली तिमाही (एक ते तीन महिने)
या कालावधीमध्ये तुम्हाला तुम्ही प्रेग्नेंट असल्याचं पहिल्यांदा कळतं. हे तीन महिने म्हणजे गरोदरपणातला एक खडतर प्रवास असतो कारण या कालावधीमध्ये काही लक्षणे जसं सकाळी उठल्यानंतर मळमळणे, थकवा अन्नाबद्दल संवेदना म्हणजे खाण्याची इच्छा न होणे ,मूड स्विंग्स म्हणजेच स्वभावा मध्ये बदल जाणवणे अशा विविध तक्रारींना सामोरे जावे लागते.
गर्भाच्या दृष्टीने सुद्धा हा कालावधी खूपच असुरक्षित असतो. बहुतांशी मिसकँरिएजेस म्हणजेच गर्भपात हे पहिल्या तिमाही मध्येच होत असतात कारण हाच तो कालावधी असतो जेव्हा गर्भ बनण्याची प्रक्रिया आईच्या पोटामध्ये होत असते.
या कालावधीमध्ये तुम्ही आनंदी आणि चिंतामुक्त असणं हे पोटात वाढणाऱ्या बाळाच्या दृष्टीने आणि त्याच्या आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा असतं.
पहिल्या तिमाही मध्येच हे संस्कार सुरू केल्यास हा कालावधी शांततामय आणि आरामदायी असल्याची जाणीव होते. पहिल्या तिमाही मध्ये होणाऱ्या अनेक त्रासदायक लक्षणांना सामोरे जाण्यास सुद्धा या मुळे बळ मिळतं.
दुसरी तिमाही (चार ते सहा महिने)
गरोदरपणाच्या प्रवासातील हा सर्वात उत्कृष्ट कालावधी आहे. पहिल्या तिमाही मध्ये होणारे अनेक त्रास नुकतेच कमी झालेले असतात आणि गरोदरपणातील एक वेगळीच चमक या तीन महिन्यांमध्ये गरोदर स्त्रीयांध्ये दिसून येते.
गरोदर स्त्रीच्या पोटात वाढणाऱ्या बाळांमध्ये सुद्धा या कालावधीमध्ये वेगाने वाढ होत असते.
या तीन महिन्यांमध्ये बाळाची श्रवण शक्ती म्हणजेच ऐकण्याची ताकद पूर्णतः वाढलेले असते याचाच अर्थ असा की बाहेरून येणाऱ्या संवेदनांना गर्भ या कालावधीमध्ये प्रतिसाद देतो.
खऱ्या अर्थाने हे संस्काराची सुरुवात या वेळेला होत असते. आता तुमचं काम हे बाळाला शिक्षण देणारा एक महत्त्वाचा दुवा असं जबाबदारीच आहे.
या कालावधीमध्ये गर्भसंस्काराचे संगीत- मंत्र ऐकणे, विविध वेदातील मंत्रांचे श्रवण करणे यामुळे वाढणाऱ्या बाळांमध्ये चांगली मूल्ये आणि सद्गुणांची भर टाकता येते.
बाळाला गर्भाशयामध्ये बाहेरून येणारे आवाज ऐकायला आवडतं. त्यांना भलेही त्याचा अर्थ लावता येत नसेल पण वेगवेगळे ताल आणि आवाज यांच्यामुळे बाळातील ऐकण्याची व बोलण्याची कौशल्ये विकसित होतात.
दुसऱ्या तिमाही मध्ये हे संस्कार करण्याचा आणखीन एक फायदा असा होतो की या कालावधीमध्ये गरोदर स्त्रीला आनंदी आणि सकारात्मक राहता येत ज्यामुळे मातृत्वाचा हा प्रवास सुखद वाटतो.
तिसरी तिमाही (सात ते नऊ महिने)
हा तो कालावधी आहे ज्यामध्ये बाळ बाहेरच्या जगामध्ये येण्यास परिपूर्ण हो आहे. या कालावधीमध्ये बाळाचं वजन वाढतं तसेच बाळाच्या शरीरामध्ये फॅट म्हणजेच चरबी सुद्धा साचायला सुरुवात होते.
या कालावधीमध्ये बाळाच्या मेंदूची सुद्धा खूप जलद वाढ होते तसेच ते अगदी स्पष्टपणे पाहू आणि ऐकू शकतात. याचबरोबर ते बाहेरून येणाऱ्या आवाज प्रकाश आणि स्पर्श अशा विविध संवेदनांना प्रतिसाद सुद्धा देतात.
गर्भसंस्कारामुळे पोटात वाढणाऱ्या बाळाला ज्या बाहेरच्या जगामध्ये त्याला यायचं आहे त्या नवीन जगाशी जवळीकता साधण्यास मदत होते.
हा कालावधी म्हणजे बाळाच्या मेंदूच्या विकासाचा पाया असतो आणि ज्यामुळे पुढील आयुष्यात हुशार बनण्यास मदत होते.
संस्कार केलेल्या मातांच्या मुलांच्या मध्ये इतर मुलांच्या तुलनेत चांगला विकास झालेला दिसून येतो. चालणं, बोलणं,पकडणं अशा विविध स्किल्स(कौशल्य) ही मुलं लवकर ग्रहण करतात. या संस्कार बाळाच्या सर्वांगीण विकासाठी मदत करतं.
सोप्या भाषेत सांगायचं तर आपण बाळाला जेवढ्या सकारात्मक संवेदना देऊ तेवढे ते बाळाच्या सर्वांगीण विकासासाठी फायदेशीर ठरतं.
तर गर्भसंस्कार केव्हा सुरू करावेत या प्रश्नाचं उत्तर हे. आतापासून लगेच सुरू करा !
डॉ. भूषण काळे डॉ .स्मिता काळे
एम एस (प्रसूती व स्त्री रोग ) एम डी (पंचकर्म ) केरळ
आयुभूषण आयुर्वेदिक वंध्यत्व निवारण आणि केरळीय पंचकर्म चिकित्सालय
(वंध्यत्व, स्त्रीरोग, गर्भसंस्कार, सुवर्णप्राशन, केरळीय पंचकर्म)
8888511522