ओळख पंचकर्माची - भाग ८: बस्ती चिकित्सा
मागील लेखातून आपण बस्ती उपचाराचे महत्त्व आणि त्याचा उपयोग समजावून घेतला.
आता बस्ती म्हणजे काय आणि त्याच्या प्रकारांचे सखोल ज्ञान घेऊया.
बस्ती म्हणजे काय?
बस्ती या शब्दाचा अर्थ आहे “राहणे”. बस्ती दिल्यानंतर तो काही काळ शरीरात राहतो आणि अपेक्षित
उपचारात्मक कार्य करतो.
दुसरा अर्थ मूत्राशय (urinary bladder). प्राचीन काळी प्लास्टिक किंवा रबराच्या साधनांचा
शोध नसताना प्राण्यांच्या मूत्राशयाचा उपयोग बस्ती देण्यासाठी केला जात असे.
म्हणून त्याला बस्ती हे नाव पडले.
आधुनिक काळात एनिमा पॉट, सिरींज, रबरी नळी अशा साधनांचा वापर बस्ती प्रक्रियेसाठी होतो.
बस्ती कोणत्या विकारांमध्ये उपयुक्त आहे?
बस्ती हा आयुर्वेदात अर्धचिकित्सा मानला जातो, कारण तो अनेक विकारांवर प्रभावी आहे. यामध्ये खालील
विकारांचा समावेश होतो:
- अपचन,
बद्धकोष्ठता
- वातव्याधी,
सांधेदुखी, मणक्यांचे विकार
- अनियमित
मासिक पाळी
- वंध्यत्व,
शुक्राणूंची संख्या कमी असणे
- मूत्रसंस्थेचे
विकार
- त्वचारोग
बस्ती प्रक्रिया कशी असते?
बस्ती देण्यापूर्वी:
बस्ती देण्याआधी रुग्णाची नाडी, रक्तदाब, पोट, गुद परीक्षण आदी तपासण्या
केल्या जातात. नंतर रुग्णाला योग बस्ती (८ दिवस),
काल बस्ती
(१५ दिवस) किंवा कर्म बस्ती (३० दिवस) यापैकी योग्य क्रम ठरवला जातो.
बस्ती देण्याची स्थिती:
रुग्णाला टेबलवर डाव्या कुशीवर झोपवले जाते. डावा पाय सरळ ठेवून उजवा पाय
दुमडला जातो. गुदमार्गावर कॅथेटर ठेवून काढा किंवा तेल क्रमाने आत सोडले जाते.
बस्ती दिल्यानंतर:
- काढ्याचा
बस्ती दिल्यानंतर मलप्रवृत्ती येते.
- तेलाचा
बस्ती दिल्यास तो २-३ तास टिकतो आणि नंतर बाहेर पडतो.
- बस्ती
नंतर हलके भोजन आणि विश्रांती आवश्यक असते.
बस्ती प्रकार आणि त्याचे फायदे
- निरुह
बस्ती (काढ्याचा बस्ती)
- वातविकार, सांधेदुखी, अपचनात उपयुक्त.
- शरीर हलके होते, वेदना कमी होतात.
- अनुवासन
बस्ती (तेलाचा बस्ती)
- सांधेदुखी, मणक्यांचे विकार,
बद्धकोष्ठतेवर प्रभावी.
- मात्रा
बस्ती
- कमी प्रमाणातील तेल (६०-१०० मि.लि.) दिले जाते.
- साध्या ओपीडीमध्ये देता येतो.
- गॅसेस, बद्धकोष्ठता, मूळव्याध, पाठदुखी, कंबरदुखी, सांधेदुखी यावर परिणामकारक.
- यापना
बस्ती
- दूध, मांसरस, तूप, मध वापरून दिला जातो.
- मांसपेशींचे पोषण, मस्क्युलर डिस्ट्रॉफी, कॅन्सरमध्ये उपयुक्त.
- उत्तर
बस्ती
- स्त्रियांच्या योनीमार्गातून किंवा पुरुषांच्या
मूत्रमार्गातून दिला जातो.
- वंध्यत्व, गर्भाशयाचे विकार, शुक्राणूदोष यावर प्रभावी.
बस्तीचे फायदे
- पचन
सुधारते, शरीर हलके वाटते.
- वातदोष
संतुलित होतो.
- वेदनांचा
नाश होतो.
- वजन कमी
होते.
- मूळ विकार
बरा होतो.
प्रत्यक्ष अनुभव महत्वाचा
बस्ती हा शब्दशः अनुभवण्याचा विषय आहे. आयुर्वेदाच्या उपचारपद्धतीत बस्तीला
अनन्यसाधारण महत्त्व आहे.
पुढील लेखात आपण पंचकर्मातील चौथ्या उपचार प्रकाराविषयी –
नस्य – सविस्तर जाणून घेऊ.
No comments:
Post a Comment