गर्भसंस्कार - आई होताना घ्यावयाची पावले
....गर्भधारणेपूर्वी....
तुम्ही आपले कुटुंब निर्माण करण्याचा किंवा ते वाढविण्याचा निर्णय घेतलाय तर .लवकरच तुमच्या घरात एक छोटासा पाहणा येणार आहे. तुमच्या मुलाला लहान भाऊ किंवा बहीण मिळणार आहे. तुमच्या घरात बाळाची पाऊले रांगण्यापूर्वी तुम्ही काही आवश्यक पाऊले उचलायला हवीत म्हणजे मग तुमच्या घरात येणारे बाळ निरोगी असेल. या सल्ल्याच्या मदतीने तुम्ही आणि तुमचे पती भावी कालावधीसाठी स्वतःला पूर्णपणे तयार करू शकता.
गर्भधारणेपूर्वी, काही सूचना
छोटेसे बाळ तुमच्या अंगणी खेळण्यासाठी उत्सुक आहे, पण त्याला बोलावण्यापूर्वी या लहान सहान गोष्टींकडे लक्ष द्या.
प्रसूतीपूर्व डॉक्टरांचा शोध :-
तुम्ही तुमच्यासाठी एखादी दायी, मिडवाईफ किंवा प्रिमॅटल डॉक्टरांच शोध सुरू करा. खरं तर तुम्ही अजून गर्भवती नाहीत, पण पुढे चालून तुमचे वेळापत्रक खूप व्यस्त होते. त्यामुळे आताच चौकशी करा, सल्ला घ्या आणि डॉक्टरांची निवड नक्की करा..
गर्भधारणेपूर्वी तपासणी :-
खरं तर तुम्हाला प्रसूतीपूर्व तापसणी करणाऱ्या डॉक्टरांची आवश्यकता नाही. तुम्ही तुमची नियमित तपासणी करणाऱ्या महिला डॉक्टरांना भेटू शकता. या तपासणीमुळे कुणात काही वैद्यकीय कमतरता असेल तर त्याची माहिती मिळते आणि त्यावर लगेच उपचार करणे शक्य होते. गर्भावस्थेच्या काळात न घ्यावयाच्या औषधांपासूनही डॉक्टर तुम्हाला दूर ठेवतील. तुमचे वजन, आहार, खाण्या-पिण्याच्या सवयी, जीवनशैली आणि लसीकरण याविषयी त्यांचा सल्ला घ्या.
डेंटिस्टची भेट :-
गर्भवती होण्यापूर्वी एकदा तुमच्या डेंटिस्टकडे आवश्य जाऊन या. कारण तुमची भावी गर्भावस्था तुमचे दात आणि हिरड्यांवर परिणाम करू शकते. गर्भावस्थेतील हार्मोन्समुळे दात आणि हिरड्यांचा त्रास होऊ शकतो. अभ्यासातून असेही आढळून आले आहे, की गर्भावस्थेच्या गुंतागुंतीत हिरड्यांचे आजारही सामील असतात. बाळाला या जगात आणण्यापूर्वी स्वतः एकदा डेंटिस्टकडे जाऊन या. दातांचा एक्स-रे, दात भरणे किंवा ऑपरेशन वगैरेची आवश्यकता असेल तर ते करून घ्या कारण गर्भावस्थेच्या काळात हे करणे शक्य होत नाही.
कुटुबांचा इतिहास पहा :-
तुम्हाला तुमच्या कुटुंबांच्या इतिहासावर एक नजर टाकण्याबरोबरच पतीचा कौटुंबिक इतिहासही तपासून पहायला हवा, की दोन्ही कुटुंबात एखाद्या आजाराचा इतिहास तर नाही ना? अशा आजारांत डाऊन सिंड्रोम, टे-शेक आजार, सिकल सेल अॅनिमिया, थॅलिसेमिया, हिमोफेलिया, सिस्टिक फायबरोसिस किंवा प्रेगाईल एक्स सिंड्रोम यांचा समावेश होतो.
गर्भावस्थेची पूर्व माहिती :-
तुमच्या या आधीच्या गर्भावस्थेत काही अडचण्या आल्या असतील म्हणजे अकाळी प्रसूती झाली असेल किंवा एकापेक्षा अधिक गर्भपात झाले असतील, तर तुमच्या डॉक्टरांना भेटा म्हणेज ही अडचण पुन्हा निर्माण होणार नाही.
आवश्यकता भासल्यास जेनेटिक स्क्रिनिंग करा :-
एखाद्या गंभीर अनुवांशिक आजाराची माहिती मिळाली तर डॉक्टरांकडे जाऊन जेनेटिक स्क्रिनिंग करण्याबाबत सल्ला घ्या.
आधी एखादा गर्भपात होणे, रक्तसंबंधात लग्न होणे, दीर्घकाल गर्भधारणा न होणे अशी कारणे असतील तरीही जनेटिक स्क्रिनिंग करून घेणे आवश्यक होऊ शकते.
तपासण्या करा :-
या सर्व प्रकारच्या चौकशीच्या दरम्यान तुम्हाला तुमच्या काही प्रकारच्या तपासण्या करून घेण्यासाठीही तयार रहायला हवे. त्या अशा-
■ अॅनेमियाच्या तपासणीसाठी हिमोग्लोबिन किंवा हिमोटोक्रिट टेस्ट.
■ तुम्ही पॉझिटिव्ह आहात की निगेटिव्ह ते पाहण्यासाठी आर-एच फॅक्टर तपासणे. तुम्ही निगेटिव्ह असाल तर जोडीदाराचीही टेस्ट करावी लागते. (दोघेही निगेटिव्ह असाल तर त्याचा फारसा विचार करू नका.)
■ रुबेला ट्विटर या तपासणीमुळे रुबेला प्रतिरोधक क्षमता कळते.
■ व्हॅरिसेला ट्विटर, यातपासणीमुळे व्हॅरिसेला प्रतिरोधक क्षमता कळते.
■ हिपोटायटिस-बी, तुम्ही याची लस घेतली नसेल आणि तुम्ही आरोग्य सेविका असाल तर.
■ सायटोमॅग्लोव्हायरस अँटिबॉडिज तपासणी. रिपोर्ट काय आहे ते कळते. तुम्ही यावर उपचार केला असेल तर सहा महिने गर्भधारणा करू नका.
■ टॉक्सोप्लाझमोटिस ट्विटर, तुमच्याकडे बाहेर फिरणारे, कच्चे मांस खाणारे पाळीव मांजर असेल किंवा मोजे न घालता तुम्ही बागकाम करीत असाल तर. तुम्ही याची लस घेतली असेल तर याची काळजी करण्याचे कारण नाही. नसेल तर मात्र खबरदारी घ्या.
■थॉयरॉइड फंक्शन, याचा गर्भावस्थेवर परिणाम होऊ शकतो. तुम्हाला किंवा कुटुंबात कोणाला हा आजार असेल आणि तुमच्यात काही लक्षणे दिसत असतील तर ही तपासणी करावी.
■ गुप्तरोग तपासण्या. सर्व गर्भवती महिलांनी आपली गुप्तरोग ( सिफलिस, गोमोरियास कालमिडिया, हर्पिज, एच पीव्ही आणि एचआयव्ही) तपासणी नियमित स्वरुपात करून घ्यायला हवी. असे आजार नसल्याची तुम्हाला खात्री असली तरीही एकदा ही तपासणी करून घ्यावी.
क्रमशः....
डॉ. भूषण काळे डॉ .स्मिता काळे
एम एस (प्रसूती व स्त्री रोग ) एम डी (पंचकर्म ) केरळ
आयुभूषण आयुर्वेदिक वंध्यत्व निवारण आणि केरळीय पंचकर्म चिकित्सालय
(वंध्यत्व, स्त्रीरोग, गर्भसंस्कार, सुवर्णप्राशन, केरळीय पंचकर्म)