गर्भधारणा होण्यासाठी उपयुक्त आहार
तुम्ही नियमितपणे व्यायाम सुरू केलेला आहे. फॉलिकल स्टडी म्हणजे स्त्रीबीजाची वाढ तपासण्यासाठी सोनोग्राफी सुद्धा तुम्ही करत आहात. जवळपास आठ तास होईल इतकी पुरेशी झोप सुद्धा तुम्ही घेत आहात. तरीसुद्धा तुम्हाला अपेक्षित असणाऱ्या त्या दोन गुलाबी रेषा प्रेग्नेंसी च्या किट वरती तुम्हाला दिसत नाहीत.
एवढे सुद्धा करून का बरं प्रेग्नेंसी राहत नाही?
काही चूक होत आहे का?
तुम्हाला गर्भधारणा होण्यासाठी उपयुक्त असा आहार घेणं गरजेचं आहे.
गर्भधारणा होण्यासाठी सर्वप्रथम स्त्रीबीज म्हणजेच अंड्याचं, शुक्राणू म्हणजेच पुरुष बिजाकडून फलित होणे म्हणजेच फर्टिलायझेशन होणे अपेक्षित असते, ज्यातून गर्भ निर्माण होतो. गर्भ फक्त निर्माण होऊन उपयोग नाही तर तो गर्भाशयाच्या पिशवीच्या आतील अस्तराला ज्याला इंडोमेट्रियम असं म्हटलं जातं त्याला चिकटणआणि त्यामध्ये रुजण अपेक्षित आहे. वाढणाऱ्या गर्भाच्या या गर्भपिशवीला चिकटूण रुजण्याच्या प्रक्रियेलाच इम्प्लांटेशन असं म्हटलं जातं. आणि या प्रक्रियेमध्येच तुम्ही सकस आणि संतुलित आहार घेणे तुमच्या गर्भाला तुमच्या शरीरात तुमच्या गर्भ पिशवीशी जुळण्यास सहाय्यकारी ठरतं.
यासाठीच आज आपण आजच्या ब्लॉगच्या सिरीज मध्ये गर्भधारणेसाठी उपयुक्त अशा आहाराविषयी जाणून घेणार आहोत. जे गर्भधारणा म्हणजेच इम्प्लांटेशन तसेच गर्भिणी अवस्था म्हणजेच प्रेग्नेंसी मध्ये अतिशय महत्त्वपूर्ण ठरते.
इम्प्लांटेशन म्हणजे नेमकं काय?
सकस आहाराची थाळी बनवण्यापूर्वी यासाठी हा सकस आहार आपण ज्यासाठी घेणार आहोत ती प्रक्रिया - इम्प्लांटेशन किंवा गर्भधारणा म्हणजे नेमकं काय हे प्रथम पाहूया. स्त्री बीजाचं पुरुष बिजाकडून फलन झाल्यानंतर गर्भ निर्मितीचे प्रक्रिया सुरू होते त्यानंतर हा वाढणारा गर्भ आईच्या गर्भाशयाच्या पिशवीमध्ये आतील अस्तरावर एक सुरक्षित जागा शोधतो आणि त्या जागेला जाऊन चिकटतो. ही प्रक्रिया तुमच्या शरीराला सांगते की...अगं तू प्रेग्नेंट आहेस!! आणि त्यानंतर काही हार्मोन्स म्हणजेच संप्रेरकांची निर्मिती शरीराद्वारे सुरू होते. ज्यामध्ये सर्वात महत्त्वाचं हार्मोन आहे एच.सी.जी (ह्यूमन कोरियानिक गोनॅडो ट्रॉफीन). हा एचसीजी नावाचा हार्मोन तुमची मासिक पाळी थांबवतो आणि जी प्रेग्नेंसी टेस्ट तुम्ही करता त्याचा निकाल पॉझिटिव्ह दाखवतो. त्याचबरोबर ही इम्प्लांटेशनची प्रक्रिया गर्भाला शरीरामध्ये रुजल्यानंतर आईकडून त्याच्या वाढीसाठी आवश्यक असणारे पोषकांश आईकडून घेऊन स्वतःची वाढ करण्यास मदत करतो.
गर्भाच्या या वाढीच्या प्रवासामध्ये एक टाइम लाईन असते ती थोडक्यात आपण समजावून घेऊया:-
Fertilization/स्त्री व पुरुष बी ज्याचा संयोग (० ते १ दिवस) - प्रत्येक महिन्याला तुमचं शरीर एक परिपक्व अंड तुमच्या फॉलोपियन ट्यूब म्हणजेच गर्भाशय नलिकेमध्ये सोडत असतं. जेव्हा हे स्त्रीबीज गर्भाशयनलिकेमध्ये येतं तेव्हा त्याच्याकडे फर्टिलायझेशन म्हणजेच पुरुष बिजाशी संयोग होण्यासाठी 24 तासाचा कालावधी असतो. या कालावधीमध्ये या अंड्याचा जर पुरुष बिजाशी संयोग झाला तर ते अंड फलित होतं आणि गर्भधारणा होते.
पेशींचे विभाजन/Cell division (१ ते ७ दिवस) - पुढच्या आठवड्यामध्ये तुमचं वाढणार भृण हे हे व्यस्त होतं. या पेशी वेगाने विभाजित होऊ लागतात आणि एक ब्लास्टोसिस्ट नावाचा घटक तयार होतो.
हा ब्लास्टोसिस्ट तयार होत असतानाच गर्भाशय नलिकेद्वारे गर्भाशयाच्या दिशेने जातो.
Implantation/गर्भ रुजणे (८ ते९ दिवस) - ही ती गोष्ट आहे ज्याची गर्भाशय वाट पाहत असते. आणि अशी आशा असते की ब्लास्टोसिस्ट या गर्भाशयाच्या अस्तरांमध्ये ज्याला इंडोमेट्रीयम म्हटलं जातं त्याच्यामध्ये रुजला जावा. जर असं झालं आणि इम्प्लांटेशन यशस्वी झालं तर मग... अभिनंदन! तुम्ही पहिल्या तिमाहीच्या बोटीमध्ये चढलेल्या आहात. आणि जर असं झालं नाही, तर हे वाढणार भृण येणाऱ्या पाळी मधून शरीरातून बाहेर जाईल.
तुम्हाला वाटत असेल, एकदा का फर्टीलायझेशन म्हणजे शुक्राणू आणि स्त्रीबीज यांचा संयोग झाला तर गर्भ नक्कीच रुजत असेल म्हणजेच इम्प्लांटेशन होतच असेल पण वस्तुस्थिती सांगायची झाली तर 60 टक्के भृण इम्प्लांटेशनचा टप्पा पार नाही करू शकत. आणि हे होण्यासाठी तुमच्या शरीरात इम्प्लांटेशनची शक्यता वाढवण्यासाठी सर्वात महत्त्वाचा एक घटक ठरतो तो म्हणजे संतुलित आणि पूरक असा आहार.
गर्भधारणेसाठी मदत करणारा आहार कोणता?
गर्भधारणेसाठी मदत करणारा आहार तो असतो जो वाढणाऱ्या भृणाला गर्भाशयाची आतील अस्तराशी चिकटण्यास मदत करतो आणि पुढील नऊ महिन्यासाठी त्या घरामध्ये राहण्यास सहायता करतो.
प्रत्येक महिन्याला प्रोजेस्टेरोन नावाचा हार्मोन म्हणजेच संप्रेरक तुमच्या गर्भाशयाच्या पिशवीतील अस्तराची जाडी वाढवत असते जे वाढणाऱ्या भृणाला चिकटण्यासाठी मदत करते. हे सर्व होत असताना साध्या ताणतणावापासून ते पोषक आहार न घेणे अशा सर्व गोष्टी आपल्या शरीरातील हार्मोन्सचे संतुलन बिघडवतात आणि इम्प्लांटेशन ची शक्यता कमी होते.
याचबरोबर उलटी, मळमळ, चक्कर येणे, पोट दुखणे थोड्या प्रमाणात अंगावरून जाणे अशा विविध तक्रारींना सुद्धा पहिल्या तिमाहीमध्ये सामोरे जावे लागते. या सर्वांचा विचार करून आहाराचे नियोजन करणे गरजेचे असते.
लिंबू वर्गातील फळे -
गर्भाशयाचे आतील अस्तर जाड आणि गर्भधारणेसाठी सुपीक होण्याकरिता प्रोजेक्ट नामक हार्मोनची पातळी संतुलित असणे गरजेचे असते. ही पातळी संतुलित करण्याकरिता लिंबू वर्गातील फळे ज्यांच्यामध्ये विटामिन सी मुबलक प्रमाणात असते हे प्रोजेस्टेरॉनची पातळी वाढविण्यासाठी मदत करतात.
या वर्गामध्ये लिंबू, संत्री, द्राक्षे अशा फळांचा समावेश होतो.
मसूर, सोयाबीन, शेंगा यांच्यामध्ये झिंक मुबलक प्रमाणात उपलब्ध असते हे देखील पोजेस्टरोन या हार्मोनची पातळी संतुलित ठेवण्यास मदत करते.
द्रव म्हणजेच पातळ, मधुर म्हणजेच गोड आणि बृहन म्हणजेच पोषण करणारा आहार पहिल्या तिमाही मध्ये घेणे गरजेचे असते.
उलटी आणि मळमळ याचे प्रमाण अधिक असल्यामुळे आणि हार्मोन्स मुळे शरीरात थकवा जाणवत असल्यामुळे दुधाचा वापर या तिमाही मध्ये विशेष करून पहिल्या महिन्यामध्ये ईस्ट ठरते.
मूग, मुगाची पेज, डाळ, भात, नारळाचे पाणी यांचा वापर करणे सुद्धा अतिशय फायदेशीर ठरते.
डॉ. भूषण काळे डॉ .स्मिता काळे
एम एस (प्रसूती व स्त्री रोग ) एम डी (पंचकर्म ) केरळ
आयुभूषण आयुर्वेदिक वंध्यत्व निवारण आणि केरळीय पंचकर्म चिकित्सालय
(वंध्यत्व, स्त्रीरोग, गर्भसंस्कार, सुवर्णप्राशन, केरळीय पंचकर्म)