Wednesday, 5 July 2023

गर्भसंस्कार - आई होताना घ्यावयाची पावले

 गर्भसंस्कार - आई होताना घ्यावयाची पावले  

....गर्भधारणेपूर्वी....

(क्रमशः)


उपचार करा :-

वरीलपैकी कोणत्याही तपासणीत काही आढळून आले तर त्यावर लगेच उपचार करा. एखादे लहान-मोठे ऑपरेशन किंवा आतापर्यंत टाळीत आलेला दुसरा कोणताही उपचार असेल तर तो करून घ्या. नाहीतर गर्भावस्थेतत त्यामुळे काही अडचणी निर्माण होऊ शकतील. अशा अडचणी खालीलप्रमाणे असू शकतात -

युटेराईन प्रोलॅप्स, फायब्रोईड, सिस्ट किंवा बेनाई ट्युमर.

एंडोमिट्रोसिस (गर्भाशयाच्याआतील असणाऱ्या रक्ताच्यापेशी शरीराच्या इतर भागात पसरतात तेव्हा.)

पेल्व्हिक इंफ्लामेट्री आजार.

मुत्राशयाला होणारे संसर्गजन्य आजार किंवा बॅक्टेरियल व्हॅजिनोसिस.

एखादा एस.टी.डी.(लैंगिक) आजार

 

लसीकरण करून घ्या :-



गेल्या दहा वर्षात तुम्ही टिटेनस, डिप्थिरिया बूस्टर याची लस घेतली नसेल तर घ्या. मीजल्स, म्पस आणि रुबेलाची लस घेतली नसेल तर घ्या आणि गर्भधारणेसाठी एक महिना थांबा. तुम्ही आधीच गर्भवती राहिला असाल तरीही काळजी करण्याचे काही कारण नाही. तुम्हाल हिपोटायटस- बी किंवा चिकनपॉक्स या आजारांची काही भीती नसली तरीही त्याची व्यवस्था करा. तुमचे वय २६ वर्षांपेक्षा कमी असेल तर एचपीव्हीचे तिन्ही डोस घ्या. त्यासाठी पूर्वतयारी करा.

  

क्रोनिक (जुनाट) रोगांवर नियंत्रण मिळवा :-

 तुम्हाला मधुमेह, दमा, पिलेप्सी यासारखे क्रोनिक म्हणजे दीर्घकाळ सोबत करणारे आजार असतील तर गर्भधारणेपूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि हे आजार नियंत्रणात आणा. स्वतःची चांगल्या प्रकारे काळजी घ्या. तुम्ही जर जन्मापासूनच 'फिनाइलक्युटोन्युरिया' या आजाराने आजारी असाल तर फिनाइलेलेनिन युक्त आहार घ्यायला सुरुवात करा आणि गर्भावस्थेच्या काळातही तो सुरू ठेवा. हे गर्भाच्या आणि तुमच्या दोघांच्याही आरोग्यासाठी चांगले ठरेल.


तुम्हाला जर कशाची अॅलर्जी असेल तर त्याकडेही लक्ष द्या. निराशेमुळे तुमच्या आनंददायी गर्भावस्थेला अडचण होऊ शकते त्यामुळे त्यावर आधी उपचार करा.

 

बर्थ कंट्रल बंद करा :-




तुमचे कंडोम आणि डायफ्रागम
वापरणे बंद करा. (खरं तर गर्भधारणेनंतर पुन्हा त्यांची गरज पडणार आहे.) बर्थ कंट्रोल करण्याच्या गोळ्या, व्हेजायनल रिंग किंवा पॅचचा वापर करीत असाल तर याबाबत डॉक्टरांचा सल्ला घ्या. कारण तुम्हाला हे सर्व काही महिने आधी बंद करावे लागते म्हणजे प्रजननसंस्था योग्य प्रकारे काम सुरू करू शकते. त्यासाठी दोन तरी मासिक पाळ्या योग्य कालावधीत यायला हव्यात. ( या दरम्यान निरोधचा वापर करावा.) तुमचे मासिक चक्र नियमित व्हायला दोन-तीन किवा त्याहून अधिक महिने लागू शकतात.

 तुम्ही जर आय़यूडी (IUD)लावली असेल तर ती काढून टाका. डेप्रोप्रोवेरा बंद केल्यानंतर सहा महिने थांबा. काही महिला तर हे बंद केल्यानंतरसुद्धा १० महिने गर्भधारणा करू शकत नाहीत. यानुसारच तुम्ही तुमचे प्लानिंग करा.

 

आहारातील सुधारणा :-



तुम्ही कदाचित आतापासून दोन जिवांसाठी लागणारा आहार गेत नसाल, पण चांगल्या सवयींना वेळ कशासाठी? तुम्ही तुमचा फॉलिक अॅसिडचा डोस घ्यायला विसरू नका. त्यामुळे गर्भधारणेची क्षमता वाढते. शिवाय अभ्यासातून असेही आढळले आहे, की गर्भधारणेच्या आधी आपल्या आहारात या जीवनसत्त्वाचा समावेश करणाऱ्या महिलांना ‘न्यूरल ट्यूब इफेक्ट' चा धोका खूप कमी उरतो. ते कडधान्य, हिरव्या पालेभाज्या यामध्ये आढळते. शिवाय तुम्हाला डोस म्हणूनही ते घ्यावे लागेल. त्यासाठी डॉक्टरांना विचारा.

जंकफूड आणि मेदयुक्त आहार बंद करा. आहारात फळे, भाज्या, कमी मेद असलेलेल दुधाचे पदार्थ यांचे प्रमाण वाढवा. संतुलित आहाराकडेही लक्ष द्या. गर्भधारणेपूर्वी व तुम्हाला रोज दोन चमचे प्रोटिन्स, तीन चमचे कॅल्शियम आणि साह चमचे कडधान्ये घ्यायला हवीत. अर्थात यामध्ये कॅलरिजचे प्रमाण वाढविण्याची काही आवश्यकता नाही.


तुमच्या आहारविषयक काही सवयी (व्रत
, वैकल्य, उपवास) गर्भावस्थेत काही अडचणी निर्माण करू शकणार असतील तर त्याबाबत डॉक्टरांचा सल्ला घ्या.

 

प्रसूतीपूर्व व्हिटॅमिन्स घ्या :-


आहारात फॉलिक ॲसिडयुक्त पदार्थांचा मोठ्या प्रमाणात समावेश असला तरीही तुम्हाला गर्भधारणेच्या दोन महिने आधी
प्रीनेटल पुरक म्हणून ४०० एमसीजीचा डोस घ्यायला हवा. त्याचे अनेक लाभ आहेत. अभ्यासातून असे आढळून आले आहे, की ज्या महिला गर्भधारणेच्या पूर्वी तसेच गर्भधारणेनंतर सुरूवातीच्या काही आठवड्यात मल्टिव्हिटॅमिन गोळ्या घेतात त्यांना उलटी आणि मळमळीचा त्रास होत नाही. त्यामध्ये १५ एमजी. झिंकचा समावेश असायला हवा. त्यामुळे गर्भधारणेची क्षमता वाढते. अर्थात आवश्यकतेपेक्षा अधिक प्रमाणात काही सत्त्वांचे सेवन केले तर त्यामुळे नुकसानही होऊ शकते त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानेच पुढे जा.


क्रमशः....

 डॉ. भूषण काळे                                                                                              डॉ .स्मिता काळे 

  एम एस (प्रसूती व स्त्री रोग )                                                                                       एम डी (पंचकर्म ) केरळ

                       आयुभूषण आयुर्वेदिक वंध्यत्व निवारण आणि केरळीय पंचकर्म चिकित्सालय

                             (वंध्यत्व, स्त्रीरोग, गर्भसंस्कार, सुवर्णप्राशन, केरळीय पंचकर्म)

                                                                        8888511522

No comments:

Post a Comment