Monday, 10 July 2023

गर्भसंस्कार - आई होताना घ्यावयाची पावले

 गर्भसंस्कार - आई होताना घ्यावयाची पावले  

....गर्भधारणेपूर्वी....

(क्रमशः)

पर्यावरण प्रदूषणाचा धोका :- 



काही रसायनांचा मोठ्या प्रमाणात वापर केल्यामुळे किंवा सतत त्यांच्या संपर्कात आल्यामुळे गर्भधारणा होण्यापूर्वी तसेच झाल्यानंतर गर्भाला धोका होऊ शकतो. कामाच्या वेळी धोकादायक रसायने काळजीपूर्वक हाताळा. औषधी, दंत चिकित्सा, कला, फोटोग्राफी, प्रवास, लँडस्केपिंग, हेअर ड्रेसिंग, कॉस्मोटॉलॉजी, ड्रायक्लिनिंग आणि कारखान्यातील कामाच्या वेळी खास दक्षता बाळगा. शक्य असले तर अशा ठिकाणाहून काही काळासाठी बदली करून घ्या. घरी किंवा कामाच्या ठिकाणी शिशाचे प्रमाण अधिक असेल तर त्याचा परिणाम तुमच्यावर आणि गर्भावरही होऊ शकतो. घरगुती विषारी पदार्थांपासून दूर रहा.


आर्थिक परिपूर्णता :- 



हे प्रकरण प्रचंड खर्चाचे आहे त्यामुळे आपल्या जोडीदाराशी सल्लामसलत तयार करून खर्चाची तजवीज करा. आरोग्य विम्यातून प्रसूतीचा आणि नंतरचा खर्च मिळेल की नाही, याची माहिती करून घ्या. अशी पॉलिशी झाली नसेल तर थोडी कळ सोसा. तुम्ही अशी पॉलिशी अजून घेतली नसेल तर ती घेण्याची हीच योग्य वेळ आहे.

 

काही महत्त्वाचे मुद्दे :- 



गर्भावस्थेच्या काळातील तुमच्या कामाचा विचार करा. तुमचा नोकरी बदलण्याचा विचार असेल तर आताच तयारी करा. पुढे आलेले पोट घेऊन मुलाखतीला जाणे नक्कीच आवडणार नाही. 

 

अंदाज करा :- 




आपली मासिक पाळी आणि ओव्यूलेशन लक्षात घ्या. त्यामुळे तुम्ही योग्य वेळी समागम(संभोग) करू शकाल तसेच गर्भधारणेची योग्य वेळही माहीत करून घेऊ शकाल. समागमाची तारीख आणि वेळ लिहिल्यामुळेही अंदाज लावणे शक्य होते.

 

थोडा वेळ द्या :- 




सर्वसाधारण निरोगी असलेल्या २५ वर्षीय तरूणीला गर्भधारणेसाठी ६ महिने लागू शकतात. जास्त वयाच्या स्त्रियांना जास्त वेळ लागू शकतो. तुमच्या जोडीदाराचे वय अधिक असेल तर हा कालावधी आणखी वाढू शकतो. या प्रकरणी कोणत्याही डॉक्टरांचा सल्ला घेण्यापूर्वी किमान सहा महिने वाट पहा. तुमचे वय ३५ वर्षांपेक्षा अधिक असेल तर ६ महिन्यानंतरच डॉक्टरांचा सल्ला घ्या.

 

विश्रांती घ्या :- 




खरं तर हे सर्वात आवश्यक काम आहे. खरं तर येणाऱ्या काळाचा विचार करता तुम्ही खूप उत्साही असता आणि त्यामुळे तणावातही राहता
, पण हाच तणाव गर्भधारणेसाठी अडचण होऊ शकतो. थोडे लक्ष द्या आणि विश्रांती देणारा व्यायाम करा. जीवनातून तणाव दूर ठेवा.



    डॉ. भूषण काळे                                                                                              डॉ .स्मिता काळे 

  एम एस (प्रसूती व स्त्री रोग )                                                                                       एम डी (पंचकर्म ) केरळ

                       आयुभूषण आयुर्वेदिक वंध्यत्व निवारण आणि केरळीय पंचकर्म चिकित्सालय

                             (वंध्यत्व, स्त्रीरोग, गर्भसंस्कार, सुवर्णप्राशन, केरळीय पंचकर्म)

                                                                        8888511522




No comments:

Post a Comment