Friday, 14 July 2023

 

गर्भसंस्कार - आई होताना घ्यावयाची पावले  

गर्भावस्थेची प्राथमिक लक्षणे

"आपण गर्भवती आहोत  याची खात्री करण्याची सर्वाधिक योग्य पद्धत अशी आहे, की तुमची प्रेगनन्सी टेस्ट पॉझिटिव्ह यायला हवी. तेव्हाच तुम्ही आई होणार आहात की नाही, हे कळू शकते. अनेक महिलांना कित्येक आठवडे गर्भावस्थेची माहिती कळत नाही, तर काही महिलांना आपण आई होणार असल्याचे आधीच कळते. तुम्हालाही जर अशी काही लक्षणे आढळून येत असतील तर होम प्रेगनन्सी कीट घरी आणायला उशीर करू नका. हे किट कोणत्याही मेडिकल स्टोअरमध्ये ही कीट सहज मिळू शकते.

 

मऊ वक्ष आणि निप्पल :- 



पाळी येण्याच्या आधी वक्षांना स्पर्श केल्यावरही किती त्रास होत असे, याची तर तुम्हाला कल्पना असतेच. गर्भधारणेपूर्वी वक्ष खूप मऊ होतात. अनेक महिलांचे वक्ष संवेदनशील, भरलेले, स्पर्श केल्यावर दुखत असतील तर ते गर्भधारणेचे लक्षण असू शकते. एकदा गर्भावस्था सुरू झाल्यावर वक्षांच्या आकारात बदल व्हायला लागतो त्याच बरोबर इतरही फरक जाणवू लागतात.

 

स्तनाग्रांचा गडदपणा :- 

निप्पलच्या भोवतालचा काळा भाग आणखी गडद व्हायला लागतो. गर्भावस्थेत असे होणे नैसर्गिक असते. त्याबरोबर त्यांचा आकारही वाढायला लागतो. त्वचेच्या रंगात होणाऱ्या बदलाचा अर्थ असा होतो की तुमच्या शरीरातील प्रेगनन्सी हार्मोन्सनी आपले काम सुरू केले आहे.

 

गुढ गाठी? :- 



नाही, हे खरे नाही; पण निप्पलच्या भोवताली बारीकशा गाठी झालेल्या दिसतात. (मॉटूंगमरी ट्यूबरकल्स) खरं तर या तेलाचा स्त्राव करणाऱ्या ग्रंथी असतात आणि तुमचे निप्पल आणि त्याच्या भोवतालचा भाग तेलकट राखण्याचे काम करतात. तुम्हाला तुमच्या बाळाला स्तनपान देण्याची ही पूर्वतयारी असते. येणाऱ्या काळासाठी शरीर स्वतःला तयार करीत असते.

 

रक्ताचे डाग पडणे(रक्तस्राव होणे) :- 

भृण गर्भाशयात आपली जागा तयार करीत असते तेव्हा अनेक महिलांना बारीकसा स्त्राव होतो. हा तुमच्या पाळीच्या काही दिवस आधी होतो. याचा रंग फिक्कट गुलाबी असतो. (लाल नसतो.) याला प्लासेन्टल साईन असे म्हणतात.

 

वारंवार लघवीची इच्छा :- 

तुम्हाला वारंवार लघवीला जाण्याची इच्छा होते. गर्भधारणा झाल्यानंतर दोन तीन आठवड्यांनी वारंवार लघवीला जावे लागू शकते. 

 

थकवा :- 

इतका थकवा जाणवतो, की सारे शरीर गळून जाते. ऊर्जा संपून जाते आणि आळसावून जाता. याचे  कारण म्हणजे येणाऱ्या काळासाठी तुमचे शरीर तयार होत असते.

 

उलटी होणे :-



 गर्भावस्थेच्या पहिल्या तिमाहीत उलटी झाल्यामुळे वारंवार बाथरूमला जाण्याची वेळ आणि मळमळीचा (मॉर्निंग सिकनेस) त्रास जाणवू लागतो. तसं तर साधारणपणे हा त्रास सहा आठवड्यानंतर व्हायला लागतो.

 

वास सहन न होणे :- 

नवीन गर्भधारणा झालेल्या महिलांची वासांची क्षमता खूप मोठ्या प्रमाणात वाढते. त्यांना प्रत्येक चांगल्या वाईट वासाचा, गंधाचा सर्वात आधी पत्ता लागतो.

 

पोट फुलणे किंवा ब्लॉटिंग :- 

पोटात काही तरी फुलत, वाढत असल्यासारखा भास होतो. खरं तर यानंतर गर्भामुळे पोटाचा आकार वाढणारच असतो, पण सुरुवातीला त्यातील हळूवार फरक जाणवत असतो.

 

तापमान वाढणे :- 

'बैसल बॉडी टेंपरेचर' तुम्ही जर खास थर्मामिटरचा वापर करून सकाळी उठल्या उठल्या शरीराचे तापमान मोजले तर त्यात १ अंशाने वाढ झाल्याचे जाणवते. गर्भावस्थेच्या काळात हे तापमान वाढलेलेच असते. खरं तर हे काही खात्रीचे लक्षण नाही, पण यावरून त्या आनंददायी बातमीचा अंदाज तर येतो.

 

पाळी न येणे :- 

जर नेहमीकरता तुमची मासिक पाळी नियमित होत असेल आणि यावेळी मासिक पाळी आली नसेल तर त्यावरूनही तुम्ही गर्भवती असल्याचा अंदाज करू शकता. अनियमित मासिक पाळी असल्यास प्रेग्नन्सी निश्चित करण्यासाठी इतरही लक्षणाचां आधार घ्यावा लागतो.


 डॉ. भूषण काळे                                                                                 डॉ .स्मिता काळे 

  एम एस (प्रसूती व स्त्री रोग )                                                                  एम डी (पंचकर्म ) केरळ

                       आयुभूषण आयुर्वेदिक वंध्यत्व निवारण आणि केरळीय पंचकर्म चिकित्सालय

                             (वंध्यत्व, स्त्रीरोग, गर्भसंस्कार, सुवर्णप्राशन, केरळीय पंचकर्म)

                                                                        8888511522

No comments:

Post a Comment