किती खावे अन्न? – आयुर्वेदानुसार योग्य आहाराचे प्रमाण जाणून घ्या!
"आहार हेच औषध आहे" – आयुर्वेदाचा हा मूलमंत्र आजही तितकाच सत्य आहे.
आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत अनेकदा आपण किती खाल्ले, काय खाल्ले याकडे लक्ष न देता फक्त वेळेवर किंवा चवीनुसार खाण्यावर भर देतो. पण हा सवय आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून आणि आधुनिक आरोग्यदृष्टिकोनातूनही चुकीची आहे.
अति खाणे किंवा फारच कमी खाणे – हे दोन्ही पचनतंत्रासाठी हानिकारक ठरते. योग्य प्रमाणात अन्न सेवन केल्यास शरीर संतुलित राहते, पचनक्रिया नीट होते आणि आरोग्य टिकून राहते.
आयुर्वेद काय सांगतो अन्नाच्या प्रमाणाबद्दल?
आयुर्वेदानुसार, अन्नाचे प्रमाण ठरवताना पुढील गोष्टींचा विचार करावा:
-
प्रकृती (Vata, Pitta, Kapha)
-
हंगाम (ऋतू)
-
वय, भूक, आणि पचनशक्ती
-
दैनंदिन शारीरिक व मानसिक क्रियाकलाप
"मात्राशीला अन्नसेवनम्" – म्हणजेच योग्य मापात अन्न खाणे.
👉 "अर्धं अन्नेन पूरणं कुर्यात्, चतुर्थं उदकेन च, चतुर्थं तु विहायैव, वायवे च प्रशक्तये"
याचा अर्थ:
पोटाचा ½ भाग अन्नाने भरावा, ¼ भाग पाण्याने, आणि उरलेला ¼ भाग मोकळा ठेवावा, जेणेकरून वातसंचार सुरळीत राहील आणि पचन नीट होईल.
जाठराग्नी – आपल्या पचनशक्तीचा मुख्य स्तंभ
‘जाठराग्नी’ म्हणजे आपल्या पोटातील पचनासाठी उत्तरदायी अग्नी. ही अग्नीच खाल्लेल्या अन्नाचे रस, रक्त, मेद, मज्जा इत्यादी सप्त धातूंमध्ये रूपांतर करते.
अति खाल्ल्यास काय होते?
अन्नाचे प्रमाण मर्यादेपेक्षा जास्त घेतल्यास जाठराग्नी कमकुवत होतो. अन्न नीट पचत नाही आणि तयार होतो ‘आम’ – हा अपचनीय कचरा शरीरात साचून अनेक आजार निर्माण करतो.
उदा:
-
अपचन
-
अॅसिडिटी
-
सुस्ती
-
त्वचाविकार
-
जोडदुखी
-
मानसिक अस्वस्थता
आधुनिक विज्ञान काय सांग?
-
Overeating मुळे insulin resistance, obesity, sleep apnea, आणि gut imbalance यांसारख्या समस्या वाढतात.
-
सतत अन्न खाल्ल्याने digestion आणि metabolic rest मिळत नाही, ज्यामुळे शरीरातील सूज (inflammation) वाढते.
-
योग्य प्रमाणात खाल्ल्यास blood sugar balance, energy levels, आणि mental clarity टिकून राहते.
योग्य अन्नप्रमाणाचे फायदे
-
उत्तम पचन आणि नियमित शौचक्रिया
-
हलके आणि उत्साही शरीर
-
दीर्घकालीन रोगप्रतिबंधक क्षमता
-
ताजेपणा आणि मानसिक स्थैर्य
-
वजन नियंत्रण
योग्य वेळ, योग्य प्रमाण – आरोग्याचा मंत्र
"भूक लागल्यावरच खा, अन्नावर लक्ष केंद्रित करा आणि मोबाईल/टीव्हीपासून दूर राहा."
Dr. Bhushan Kale.
Dr. Smeeta Kale.
Contact - 9665351355
- 8888511522
No comments:
Post a Comment