गर्भसंस्कार -
आई होताना घ्यावयाची पावले
....गर्भधारणेपूर्वी....
(क्रमशः)
भावी पित्यासाठी काही सूचना
एक वडील म्हणून तुम्हाला आतापासूनच एक वेगळी रूम बांधण्याची आवश्यकता नसली तरीही
तुम्ही या सर्व प्रक्रियेत सहकार्य करायला हवे. (एकटी आई काय - काय करेल ?) या सल्ल्यांच्या मदतीने
ही प्रक्रिया आणखी सोपी व्हायला मदत होते.
डॉक्टरांना भेटा :-
खरं तर तुम्हाला काही गर्भधारणा करायची नाही, तरीही तुमच्या डॉक्टरांना भेटून तपासणी करून घ्या. दोन
निरोगी शरीराच्या मिलनातूनच एक निरोगी बाळ जन्माला येऊ शकते. परिपूर्ण तपासणी
केल्यानंतरच तुम्हाला टेस्टिकूलर सिस्ट किंवा ट्यूमर सारख्या आजारांना बळी पडलेले
नाहीत ना? अथवा निराशेसारखा मानसिक
आजार तुमच्या वडील बनण्याच्या मार्गातील अडकाठी बनत नाही ना? लैंगिक परिणाम, हर्बल औषधी आणि स्पर्म काऊंट याची डॉक्टरांकडून माहिती करून
घ्या. या सर्व बाबींची माहिती मिळविल्यानंतरच तुम्हा एका निरोगी बाळाचे वडील बनू शकता.
आवश्यकता असेल तर जेनेटिक स्क्रिनिंग (गुणसूत्रांची तपासणी) :-
तुमच्या कुटुंबात कोणाला अनुवांशिक आजार असेल आणि तुमच्या जोडीदाराची हे टेस्ट
केली जात असेल तर तुम्हीही ही तपासणी आवश्य करून घ्या.
आहारातील सुधारणा :-
पोषण जितके चांगले असते तितके स्पर्म जास्त शक्तीशाली असतात. तुम्ही ताजी फळे, हिरव्या भाज्या, कडधान्ये आणि प्रोटिनयुक्त संतुलित आहार घ्यायला हवा. या काळात तुम्ही मिनरल आणि जीवनसत्त्वांचा डोसही घेऊ शकता कारण फक्त आहारातून सर्व घट मिळण्याची शक्यता नसते. यात फॉलिक अॅसिडचाही समावेश करा. अनेक वेळा या तत्त्वाच्या अभावी गर्भधारणेला वेळ लागू शकतो आणि बाळात काही जन्मजात विकृतीही निर्माण होऊ शकतात.
जीवनशैलीवर एक दृष्टिक्षेप :-
खरं तर या विषयावर अजून संशोधन व्हायचे आहे,
पण तरीही इतके तर नक्की आहे, की तुम्ही ड्रग्ज घेत असाल किंवा मोठ्या
प्रमाणात अल्कोहोलचे (मध्यपान) सेवन करीत असाल तर तुम्ही सहजा सहजी वडील होऊ शकणार नाहीत.
यामुळे स्पर्म कमी होतात असे नाही तर त्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात कमी होतात.
शिवाय टेस्टोस्टेरॉनची पातळीही कमी होते. हे योग्य नाही. मोठ्या प्रमाणात मद्यपान
केल्याने बाळाचे वजन कमी होते. तुम्ही मद्यपान कमी केले तर तुमच्या जोडीदारासाठीही
असे करणे शक्य होते. तुम्ही मद्यपान आणि ड्रग्ज सोडू शकत नसाल तर डॉक्टरांची मदत
घ्या.
वजन तपासणी :-
ज्या पुरूषांचा बॉडी मास इंडेक्स अधिक असतो, ते पुरूष सर्वसाधारण पुरूषांच्या तुलनेत नंपुसक
असतात. तुमच्या वजनातील ९ कि ग्रां. इतका वाढही हा परिणाम करू शकते, त्यामुळे गर्भधारणेला सुरूवात करण्याआधी तुमच्य
वजनाची तपासणी करा.
धुम्रपान सोडा :-
आता इथे काहीही बहाणे चालणार नाहीत. धुम्रपानामुळे स्पर्मची
संख्या कमी होते त्यामुळे हे सोडणे तुमच्या कुटुंबासाठी आरोग्यदायी असते.
तिच्यासाठीही तुमच्या सिगारेटचा धूर कमी धोकादायक नाही. त्यामुळे तुमचे बाळही एस
आय डी एस (अचानक संक्रमित आजाराने मृत्यू) पासून वाचू शकते.
रसायनांपासून दूर रहा :-
रंग, डिंक, वॉर्निश यासारख्या तीव्र रसायनांशी थेट संपर्क
येण्यापासून दूर रहा. यामुळेही तुम्ही अडचणीत येऊ शकता.
जनानांगाचा भाग थंड ठेवा :-
वृषणाचे तापमान आवश्यकतेपेक्षा जास्त असेल तर त्याचा परिणाम स्पर्मच्या उत्पादनावर होतो. शरीराच्या तापमानापेक्षा वृषणाचे तापमान कमी असते, त्यामुळेच ते शरीराला बाहेरच्या बाजूने लटकत असतात. हॉट टब बाथ, सोना, इलेक्ट्रिक केबल आणि टाईट जिन्सपासून तुम्ही दूर रहा. सिंथेटिक धाग्याची पँट किंवा अंडरवेअर घालू नका. यामुळे शरीराच्या खालच्या भागाचे तापमान वाढू शकते. लॅपटॉपचा वापर करायचाच असेल तर डेस्कटॉप प्रमाणे करा.
जननेंद्रियाची सुरक्षितता :-
तुम्ही एखादा रफ गेम (फूटबॉल, सॉकर, बास्केट बॉल, हॉकी, बेसबॉल, घोडेस्वारी इ.) खेळत असाल तर रक्षक गार्ड वापरून आपल्या जननेंद्रियाची सुरक्षा करा. जास्त सायकल चालविल्यामुळेही परेशानी होऊ शकतो. काही तज्ज्ञांचे मत तर असे आहे, की सायकलच्या सिटचा दाब पडल्यामुळे अनेक धमन्यांचे नुकसान होते. जननेंद्रियाला मुंग्या येत असतील आणि ते सुन्न पडत असतील तर डॉक्टरांना दाखवा.
विश्रांती :-
होय, आता तुम्हाला
सर्व काही माहीत झाले आहे, आता त्यावर शांत
चित्ताने अमंलबजावणी करा. या घाई गडबडीत विश्रांती घ्यायला विसरू नका. तणावामुळे
तुमच्या कामगिरीची पातळी खालावू शकते आणि स्पर्म निर्मितीत अडचण येऊ शकते. जितकी
कमी काळजी कराल तितके चांगले परिणाम झालेले आढळून येतील. शांत चित्ताने प्रयत्न करीत
रहा.
डॉ. भूषण काळे डॉ .स्मिता काळे
एम एस (प्रसूती व स्त्री रोग ) एम डी (पंचकर्म ) केरळ
आयुभूषण आयुर्वेदिक वंध्यत्व निवारण आणि केरळीय पंचकर्म चिकित्सालय
(वंध्यत्व, स्त्रीरोग, गर्भसंस्कार, सुवर्णप्राशन, केरळीय पंचकर्म)
No comments:
Post a Comment