Wednesday, 12 July 2023

 

गर्भसंस्कार - 

आई होताना घ्यावयाची पावले 

 

....गर्भधारणेपूर्वी....

(क्रमशः)

पिनपॉइंट ओव्हूलेशन (बीजांड परिपक्व होण्याची वेळ) :-

 

गर्भधारणा होण्यासाठी ओव्हयूलेशन(स्त्रीबीज ग्रंथीतून बीजांड उत्सर्जित होणे) किती महत्त्वाचे असते, हे तर तुम्हाला माहीत आहेच. इथे काही पद्धती दिल्या आहेत, ज्यांच्या मदतीने तुम्ही त्या दिवसाचा नक्की अंदाज करू शकता.

 

कॅलेंडर मेथड(दिनदर्शिका नोंदणी) :-



साधारणपणे ओव्यूलेशन तुमच्या मासिक पाळीच्या दरम्यान होत असते. साधारणपणे हे चक्र २८ दिवसांचे असते. साधारणपणे पहिल्या पाळीच्या पहिल्या दिवसापासून दुसऱ्या पाळीच्या पहिल्या दिवसापर्यंतचा हा कालावधी असतो, पण गर्भावस्थेप्रमाणे  मासिक पाळीचे आपापले स्वतंत्र चक्र असू शकते. साधारणपणे मासिक पाळीचे दिवस २३ ते २५ या  दरम्यान असू शकतात. तुमचे स्वतःचे मासिक पाळीचे चक्र महा-दरमाहा सरकू शकते. काही महिने मासिक  पाळीची नोंद ठेवल्यावर तुम्हाला तुमच्या मासिक पाळीचा  अंदाज येऊ शकतो. जर तुमची मासिक पाळी अनियमित  स्वरुपाची असेल तर तुम्हाला ओव्ह्यूलेशनसाठी दुसऱ्या  लक्षणांचा आधार घ्यावा लागेल.

 

बेसल बोडी टेम्परेचर( तापमानाची नोंद ठेवा ) :-



 तुम्हाला तुमच्या शरीराच्या तापमानाची नोंद ठेवावी लागेल. सकाळी उठल्याबरोबर  एका विशिष्ट थर्मामिटरच्या सहाय्याने तुम्हाला तुमचे  तापमान मोजावे लागेल. तुमच्या मासिक पाळीसोबत  हे तापमान बदलत असते. ओव्यूलेशनच्या वेळी ते सर्वात कमी असते आणि त्यानंतर ते अर्धा डिग्रीने  वाढत असते. या चार्टच्या मदतीने फक्त ओव्ह्यूलेशनचा  दिवसच कळणार नाही तर त्याचा पुरावाही मिळतो. काही महिन्यानंतर तुम्हाला तुमच्या मासिक पाळीच्या चक्राचा आराखडा कळतो इतकेच नाही तर त्यावरून  तुम्ही प्रसूतीची अंदाजे तारीखही काढू शकता.

 

तुमच्या अंडरगारमेन्ट्सची तपासणी करा :-



 सर्व्हायकल(गर्भाशय मुखातील स्राव) म्युकसचे प्रमाण आणि रंग यावरूनही हे संकेत मिळतात. पाळी संपल्यानंतर दिवस पुढे जातील त्याबरोबर या म्युकसचे प्रमाणही वाढते. ते बोटात धरले तर चिकट लागून त्याचा तार तुटतो. ओव्ह्यूलेशनच्या दरम्यान हा स्त्राव पहिल्यापेक्षा अधिक पातळ, स्वच्छ आणि निसरडा होतो. त्याला तुम्ही बोटात धरून काही वेळ तार तोडू शकता. यावरूनही आता तुम्ही गर्भ धारणेसाठी सम्बंध ठेवायला हवे, असा संकेत मिळतो ओव्यूलेशनच्या नंतर योनी कोरडी होते आणि हा स्त्राव घट्ट होतो. सर्व्हायकलची अवस्था आणि बॉडी टेंपरेचरच्या सहाय्याने तुम्ही ओव्ह्यूलेशनची नेमकी तारीख माहीत करून घेऊ शकता.

 

सर्व्हिक्सची (गर्भाशय मुखाची) अवस्था :-





सर्व्हिक्सच्या अवस्थेवरूनही तुम्ही ओव्ह्यूलेशनचा योग्य अंदाज करू शकता. पाळीच्या सुरुवातीला योनी आणि गर्भाशय यातील मार्ग थोडा ताणलेला असतो तर नंतर तो बंद होतो, पण ओव्यूलेशन नंतर त्याची अवस्था कळू शकते.

 

ओटीपोटातील वेदनेकडे लक्ष द्या :-



 तुमचे शरीर आपण होऊन ओव्ह्यूलेशनचे  संकेत देत असते. या काळात पोटाच्या खालच्या भागात वेदना किवा अखडल्यासारखे होते. यावरून ओव्हरीमधून अंडी बाहेर पडत असल्याचे कळते.

 

 लघवीची तपासणी :-



बाजारात आता 'ओव्ह्यूलेशन प्रिडिक्टर' ची कीटही मिळते. यातील हार्मोन्सच्या तपासणीवरून ओव्ह्यूलेशनची नेमकी तारीख कळू शकते. तुम्हाला तुमच्या लघवीत ही काडी बुडवून ही तपासणी करावी लागते

 

तुमच्या घड्याळीवर लक्ष ठेवा :-



आता असे एक यंत्र तायर झाले आहे, जे तुम्ही घड्याळीसारखे हाताला बांधू शकता. ते तुमच्या घामातील क्लोराईड, पोटॅशियम आणि सोडियमच्या प्रमाणावर लक्ष ठेवीत असते, जे दरमहा बदलत असते. ही क्लोराईडीन टेस्ट चार दिवस आधी तुम्हाला ओव्ह्यूलेशनची माहिती देऊ शकते. हाताला बांधावे लागते. योग्य निर्णयासाठी हे यंत्र तुम्हाला सहा तास सलग हाताला बांधावे लागते.

 

थुंकीची तपासणी :-



तुमच्या स्लाईव्हा टेस्टमधील ॲस्ट्रोजनच्या प्रमाणावरूनही ओव्ह्यूलेशन होणार असल्याची माहिती मिळते. या तपासणीवरून मोठ्या प्रमाणात खात्री पटते. 'पी ऑन स्टिक' पेक्षा ही तपासणी किफायतशीर आहे.


डॉ. भूषण काळे                                                                                 डॉ .स्मिता काळे 

  एम एस (प्रसूती व स्त्री रोग )                                                                  एम डी (पंचकर्म ) केरळ

                       आयुभूषण आयुर्वेदिक वंध्यत्व निवारण आणि केरळीय पंचकर्म चिकित्सालय

                             (वंध्यत्व, स्त्रीरोग, गर्भसंस्कार, सुवर्णप्राशन, केरळीय पंचकर्म)

                                                                        8888511522

No comments:

Post a Comment