Monday, 17 July 2023


गर्भसंस्कार 

(क्रमशः)

 

 गर्भावस्थेची माहिती होणे


"मी गर्भवती आहे की नाही, याची पक्की माहिती मला कशी कळेल ?"


    सर्वात आधी आपल्या मनाचा आवाज ऐका. त्यामुळे तुम्हाला थोडा फार अंदाज लागू शकतो. तसं तर खरी किंवा ठाम माहिती मिळविण्यासाठी वैद्यकीय उपाचर पद्धती आहेच. सध्या अनेक प्रकारच्या चाचण्या करून तुम्ही गरोदर आहात की नाहीत याची माहिती मिळविता येते. 


होम प्रेगनन्सी टेस्ट :- 

ही टेस्ट तुम्ही तुमच्या बाथरूममध्ये अतिशय गुप्त पद्धतीने करू शकता. ही टेस्ट खूप लवकर होते. काही तरी असे नक्कीच असते ज्यामुळे तुम्ही पाळी चुकण्याच्या आधीच अंदाज करू शकता. (खरं तर जास्त चांगले निकाल पाळी चुकल्यानंतरच लागू शकतात. )

    या टेस्टमध्ये लघवीतील एच. सी. जी. हार्मोन्सची तपासणी होते, ज्यामुळे प्लासेंटा तयार होत असतो. हे तुमच्या रक्तात मिसळायला उशीर करीत नाही. लघवीत याचा अंश आढळताच तुम्हाला पॉझिटिव्ह निकाल मिळतो. हे संवेदनशील असतात, पण इतके जास्त नाही. गर्भधारणेच्या एका आठवड्यानंतर तुमच्या रक्तात एच. सी. जी. चा अंश तर असतो, पण टेस्टमध्ये त्याची तपासणी होऊ शकत नाही. जर तुम्ही पाळी येण्याच्या सात दिवस आधी तपासणी केली तरी सुद्धा गर्भधारणा होऊन सुद्धा निगेटिव्ह निकाल येण्याची शक्यता असते.

    पाळी येण्याच्या चार दिवस आधी टेस्ट केली तर ६० टक्के योग्य निकाल मिळण्याची शक्यता असते. पाळीच्या दिवशी तपासणी केली तर ९० टक्के योग्य निकाल कळतो आणि एक आठवड्यानंतर त्याची टक्केवारी ९७ टक्के योग्य असते. काळ जसा जसा जात जाईल तसे तसे निकाल अधिक स्पष्ट होत जातात. कारण या टेस्टच्या मदतीने तुमच्या गर्भावस्थेची तुम्हाला आधीच माहिती कळते. त्यामुळे आधीपासूनच तुम्ही डॉक्टर किंवा दाईचा सल्ला घेऊन स्वतःची देखभाल करायला सुरूवात करू शकता. अर्थात यानंतर वैद्यकीय चाचणी आहे. संपूर्ण तपासणी आणि रक्ताची तपासणी यावरून सर्व काही खात्रीशीररित्या स्पष्ट होते.


रक्ताची तपासणी :-

 गर्भधारणेला एक आठवडा उलटल्यानंतर जर रक्ताची तपासणी केली तर त्यावरून तुम्ही गर्भवती आहात की नाहीत याची पाहून १०० टक्के माहिती मिळते. यामध्ये रक्तातील एच. सी. जी. चे योग्य प्रमाण आणि पातळी गर्भधारणेची तारीखही सांगता येते. कारण जसा जसा गर्भावस्थेचा काळ वाढत जातो तसे रक्तातील एच. सी. जी. चे प्रमाणही वाढत जाते. अनेक डॉक्टर्स रक्ताच्या बरोबरीने लघवीचीही तपासणी करायला सांगतात.


वैद्यकीय तपासणी :- 

अर्थात रक्त आणि लघवीच्या तपासणीवरून गर्भावस्थेची योग्य माहिती मिळविता येते, पण गर्भाशयाचा आकार, योनी आणि सर्व्हिक्सचे रंग आणि सर्व्हिक्सच्या निर्मितीतील फरक यावरूनही गर्भावस्थेची वैद्यकीय तपासणी केली जाऊ शकते.


डॉ. भूषण काळे                                                                                 डॉ .स्मिता काळे 

  एम एस (प्रसूती व स्त्री रोग )                                                                  एम डी (पंचकर्म ) केरळ

                       आयुभूषण आयुर्वेदिक वंध्यत्व निवारण आणि केरळीय पंचकर्म चिकित्सालय

                             (वंध्यत्व, स्त्रीरोग, गर्भसंस्कार, सुवर्णप्राशन, केरळीय पंचकर्म)

                                                                        8888511522

Friday, 14 July 2023

 

गर्भसंस्कार - आई होताना घ्यावयाची पावले  

गर्भावस्थेची प्राथमिक लक्षणे

"आपण गर्भवती आहोत  याची खात्री करण्याची सर्वाधिक योग्य पद्धत अशी आहे, की तुमची प्रेगनन्सी टेस्ट पॉझिटिव्ह यायला हवी. तेव्हाच तुम्ही आई होणार आहात की नाही, हे कळू शकते. अनेक महिलांना कित्येक आठवडे गर्भावस्थेची माहिती कळत नाही, तर काही महिलांना आपण आई होणार असल्याचे आधीच कळते. तुम्हालाही जर अशी काही लक्षणे आढळून येत असतील तर होम प्रेगनन्सी कीट घरी आणायला उशीर करू नका. हे किट कोणत्याही मेडिकल स्टोअरमध्ये ही कीट सहज मिळू शकते.

 

मऊ वक्ष आणि निप्पल :- 



पाळी येण्याच्या आधी वक्षांना स्पर्श केल्यावरही किती त्रास होत असे, याची तर तुम्हाला कल्पना असतेच. गर्भधारणेपूर्वी वक्ष खूप मऊ होतात. अनेक महिलांचे वक्ष संवेदनशील, भरलेले, स्पर्श केल्यावर दुखत असतील तर ते गर्भधारणेचे लक्षण असू शकते. एकदा गर्भावस्था सुरू झाल्यावर वक्षांच्या आकारात बदल व्हायला लागतो त्याच बरोबर इतरही फरक जाणवू लागतात.

 

स्तनाग्रांचा गडदपणा :- 

निप्पलच्या भोवतालचा काळा भाग आणखी गडद व्हायला लागतो. गर्भावस्थेत असे होणे नैसर्गिक असते. त्याबरोबर त्यांचा आकारही वाढायला लागतो. त्वचेच्या रंगात होणाऱ्या बदलाचा अर्थ असा होतो की तुमच्या शरीरातील प्रेगनन्सी हार्मोन्सनी आपले काम सुरू केले आहे.

 

गुढ गाठी? :- 



नाही, हे खरे नाही; पण निप्पलच्या भोवताली बारीकशा गाठी झालेल्या दिसतात. (मॉटूंगमरी ट्यूबरकल्स) खरं तर या तेलाचा स्त्राव करणाऱ्या ग्रंथी असतात आणि तुमचे निप्पल आणि त्याच्या भोवतालचा भाग तेलकट राखण्याचे काम करतात. तुम्हाला तुमच्या बाळाला स्तनपान देण्याची ही पूर्वतयारी असते. येणाऱ्या काळासाठी शरीर स्वतःला तयार करीत असते.

 

रक्ताचे डाग पडणे(रक्तस्राव होणे) :- 

भृण गर्भाशयात आपली जागा तयार करीत असते तेव्हा अनेक महिलांना बारीकसा स्त्राव होतो. हा तुमच्या पाळीच्या काही दिवस आधी होतो. याचा रंग फिक्कट गुलाबी असतो. (लाल नसतो.) याला प्लासेन्टल साईन असे म्हणतात.

 

वारंवार लघवीची इच्छा :- 

तुम्हाला वारंवार लघवीला जाण्याची इच्छा होते. गर्भधारणा झाल्यानंतर दोन तीन आठवड्यांनी वारंवार लघवीला जावे लागू शकते. 

 

थकवा :- 

इतका थकवा जाणवतो, की सारे शरीर गळून जाते. ऊर्जा संपून जाते आणि आळसावून जाता. याचे  कारण म्हणजे येणाऱ्या काळासाठी तुमचे शरीर तयार होत असते.

 

उलटी होणे :-



 गर्भावस्थेच्या पहिल्या तिमाहीत उलटी झाल्यामुळे वारंवार बाथरूमला जाण्याची वेळ आणि मळमळीचा (मॉर्निंग सिकनेस) त्रास जाणवू लागतो. तसं तर साधारणपणे हा त्रास सहा आठवड्यानंतर व्हायला लागतो.

 

वास सहन न होणे :- 

नवीन गर्भधारणा झालेल्या महिलांची वासांची क्षमता खूप मोठ्या प्रमाणात वाढते. त्यांना प्रत्येक चांगल्या वाईट वासाचा, गंधाचा सर्वात आधी पत्ता लागतो.

 

पोट फुलणे किंवा ब्लॉटिंग :- 

पोटात काही तरी फुलत, वाढत असल्यासारखा भास होतो. खरं तर यानंतर गर्भामुळे पोटाचा आकार वाढणारच असतो, पण सुरुवातीला त्यातील हळूवार फरक जाणवत असतो.

 

तापमान वाढणे :- 

'बैसल बॉडी टेंपरेचर' तुम्ही जर खास थर्मामिटरचा वापर करून सकाळी उठल्या उठल्या शरीराचे तापमान मोजले तर त्यात १ अंशाने वाढ झाल्याचे जाणवते. गर्भावस्थेच्या काळात हे तापमान वाढलेलेच असते. खरं तर हे काही खात्रीचे लक्षण नाही, पण यावरून त्या आनंददायी बातमीचा अंदाज तर येतो.

 

पाळी न येणे :- 

जर नेहमीकरता तुमची मासिक पाळी नियमित होत असेल आणि यावेळी मासिक पाळी आली नसेल तर त्यावरूनही तुम्ही गर्भवती असल्याचा अंदाज करू शकता. अनियमित मासिक पाळी असल्यास प्रेग्नन्सी निश्चित करण्यासाठी इतरही लक्षणाचां आधार घ्यावा लागतो.


 डॉ. भूषण काळे                                                                                 डॉ .स्मिता काळे 

  एम एस (प्रसूती व स्त्री रोग )                                                                  एम डी (पंचकर्म ) केरळ

                       आयुभूषण आयुर्वेदिक वंध्यत्व निवारण आणि केरळीय पंचकर्म चिकित्सालय

                             (वंध्यत्व, स्त्रीरोग, गर्भसंस्कार, सुवर्णप्राशन, केरळीय पंचकर्म)

                                                                        8888511522

Thursday, 13 July 2023

गर्भसंस्कार - 

आई होताना घ्यावयाची पावले 

 

....गर्भधारणेपूर्वी....

(क्रमशः) 


निरोगी गर्भधारणेच्या नियोजनासाठी तुम्ही काही पावले उचलू शकता


तुम्ही हा लेख वाचत असताना तुम्ही आधीच गरोदर असण्याची शक्यता असू शकते. तुम्ही तुमचे कुटुंब सुरू करण्याचा विचार करत असल्यास, गर्भधारणेपूर्वी आणि तुमच्या गर्भधारणेच्या काही आठवड्यांपूर्वी तुमची आणि तुमची जोडीदाराची तब्येत चांगली आहे याची खात्री करण्यासाठी काही सोप्या उपाय आहेत. उदाहरणार्थ, गोळी घेणे थांबवणे आणि गर्भधारणेचा प्रयत्न करण्यापूर्वी तीन ते सहा महिने गर्भनिरोधकाचा पर्याय वापरणे, तुमच्या शरीराला त्याचे सामान्य हार्मोन्स देणे हे शहाणपणाचे आहे.

 


जर तुम्ही आता गरोदर असाल, तर गर्भधारणेची तयारी करण्यासंबंधीचा बराचसा सल्ला भविष्यातील कौटुंबिक जीवनासाठी एक चांगली दिशा देऊ शकतो. तुमच्याकडे पुरेशा पोषक तत्वांचा समतोल असल्याची खात्री करण्यासाठी आणि तुमच्या आहारातील असंतुलनामुळे किंवा संभाव्य हानिकारक रसायनांच्या शोषणामुळे तुमच्या शरीरात असणारी नकारात्मक रसायने कमी करण्यात मदत करण्यासाठी आवश्यक आहे. धूम्रपान, अल्कोहोल(मध्यपान) यांचे धोके समजावून घेवून त्यापासून लांब रहा . जिथे शक्य असेल तिथे रिफाइंड तेल , कार्बोहायड्रेट, साखर, चहा, कॉफी, मिठाई आणि  चरबीयक्त पदार्थ टाळा किंवा कमी करा आणि ताजी फळे वाढवा. नियमित जेवण घ्या, आहार टाळा. प्रिझर्व्हेटिव्ह्ज, कलरिंग्ज आणि आर्टिफिशियल स्वीटनर्स, विशेषत: टारट्राझिन, ऑरेंज कलरिंग असलेले पदार्थ टाळण्याचा किंवा कमी करण्याचा प्रयत्न करा. पालेभ्ज्या , कडधान्ये यांचा वापर वाढवा.

 

दररोज पर्याप्त आणि गरजेनुसारच  पाणी प्या आणि गर्भधारणेपूर्वी किमान चार महिने धूम्रपान, मद्यपान आणि अनावश्यक (म्हणजे मनोरंजक) औषधे सोडून द्या. तुम्हाला अलर्जी(अन्न असहिष्णुता) असू शकते असे वाटत असल्यास, विशेषत: जर तुम्हाला एक्जिमा, दमा, मायग्रेन, निद्रानाश किंवा नैराश्याने ग्रासले असेल, जे काही खाद्यपदार्थांमुळे असमतोलामुळे होऊ शकते किंवा खराब होऊ शकते असे तुम्हाला वाटत असल्यास, ऍलर्जी तज्ञाचा सल्ला घ्या. तुमची रुबेला (जर्मन गोवर) पासून रोगप्रतिकारक शक्ती आहे की नाही हे तुमच्या डॉक्टरांना तपासा आणि नसल्यास, गरोदर होण्याचा प्रयत्न करण्यापूर्वी किमान तीन महिने आधी लसीकरणासाठी सांगा, कारण गर्भधारणेच्या सुरुवातीच्या काळात रुबेला संसर्गाचा संपर्क तुमच्या विकसनशील बाळासाठी हानिकारक ठरू शकतो.

 

गरोदरपणाच्या सुरुवातीच्या काळात तुम्हाला रुबेलाचा संसर्ग झाल्यास, हा विषाणू तुमच्या बाळाला जाऊ शकतो, ज्यामुळे बहिरेपणा (सर्वात सामान्य समस्या), अंधत्व आणि हृदयविकाराचा धोका संभवतो.



घातक पदार्थांच्या संपर्कात येण्यामुळे प्रजनन समस्या उद्भवू शकतात, ज्यामुळे तुमच्या जोडीदाराद्वारे तयार केलेल्या निरोगी शुक्राणूंची संख्या कमी होते किंवा तुमच्या अंडी आणि हार्मोन्सवर विपरित परिणाम होतो. जर तुम्हाला विशेषतः हानिकारक पदार्थांच्या संपर्कात येण्याचा धोका असेल तर, उदाहरणार्थ, तुमच्या नोकरीमुळे सावधगिरी बाळगली पाहिजे. शक्य असल्यास, कीटकनाशके आणि कीटकनाशकांचे परिणाम टाळण्यासाठी तुम्हाला परवडेल तितके सेंद्रिय पद्धतीने पिकवलेले अन्न खरेदी करा. इतर संभाव्य हानीकारक घरगुती पदार्थांमध्ये नवीन कार्पेट्स आणि फर्निशिंग फॅब्रिक्सचा समावेश होतो, उदाहरणार्थ ज्वाला मंद करणारे पदार्थ, पाळीव प्राण्यांचे पिसू कॉलर, लाकूड अळी. इलेक्ट्रिक ब्लँकेट, मायक्रोवेव्ह आणि कोणत्याही अनावश्यक क्ष-किरणांचा दीर्घकाळ वापर टाळा; संगणक  दिवसातून तीन ते चार तासांपेक्षा जास्त काळ वापरला जाऊ नये, शक्यतो फिल्टर स्क्रीनसह, आणि तुम्ही गर्भधारणेचा प्रयत्न करत असताना आणि एकदा तुम्ही गरोदर असताना सनबेड टाळावेत.

 

(क्रमशः) 


     डॉ. भूषण काळे                                                                                 डॉ .स्मिता काळे 

  एम एस (प्रसूती व स्त्री रोग )                                                                  एम डी (पंचकर्म ) केरळ

                       आयुभूषण आयुर्वेदिक वंध्यत्व निवारण आणि केरळीय पंचकर्म चिकित्सालय

                             (वंध्यत्व, स्त्रीरोग, गर्भसंस्कार, सुवर्णप्राशन, केरळीय पंचकर्म)

                                                                        8888511522

Wednesday, 12 July 2023

 

गर्भसंस्कार - 

आई होताना घ्यावयाची पावले 

 

....गर्भधारणेपूर्वी....

(क्रमशः)

पिनपॉइंट ओव्हूलेशन (बीजांड परिपक्व होण्याची वेळ) :-

 

गर्भधारणा होण्यासाठी ओव्हयूलेशन(स्त्रीबीज ग्रंथीतून बीजांड उत्सर्जित होणे) किती महत्त्वाचे असते, हे तर तुम्हाला माहीत आहेच. इथे काही पद्धती दिल्या आहेत, ज्यांच्या मदतीने तुम्ही त्या दिवसाचा नक्की अंदाज करू शकता.

 

कॅलेंडर मेथड(दिनदर्शिका नोंदणी) :-



साधारणपणे ओव्यूलेशन तुमच्या मासिक पाळीच्या दरम्यान होत असते. साधारणपणे हे चक्र २८ दिवसांचे असते. साधारणपणे पहिल्या पाळीच्या पहिल्या दिवसापासून दुसऱ्या पाळीच्या पहिल्या दिवसापर्यंतचा हा कालावधी असतो, पण गर्भावस्थेप्रमाणे  मासिक पाळीचे आपापले स्वतंत्र चक्र असू शकते. साधारणपणे मासिक पाळीचे दिवस २३ ते २५ या  दरम्यान असू शकतात. तुमचे स्वतःचे मासिक पाळीचे चक्र महा-दरमाहा सरकू शकते. काही महिने मासिक  पाळीची नोंद ठेवल्यावर तुम्हाला तुमच्या मासिक पाळीचा  अंदाज येऊ शकतो. जर तुमची मासिक पाळी अनियमित  स्वरुपाची असेल तर तुम्हाला ओव्ह्यूलेशनसाठी दुसऱ्या  लक्षणांचा आधार घ्यावा लागेल.

 

बेसल बोडी टेम्परेचर( तापमानाची नोंद ठेवा ) :-



 तुम्हाला तुमच्या शरीराच्या तापमानाची नोंद ठेवावी लागेल. सकाळी उठल्याबरोबर  एका विशिष्ट थर्मामिटरच्या सहाय्याने तुम्हाला तुमचे  तापमान मोजावे लागेल. तुमच्या मासिक पाळीसोबत  हे तापमान बदलत असते. ओव्यूलेशनच्या वेळी ते सर्वात कमी असते आणि त्यानंतर ते अर्धा डिग्रीने  वाढत असते. या चार्टच्या मदतीने फक्त ओव्ह्यूलेशनचा  दिवसच कळणार नाही तर त्याचा पुरावाही मिळतो. काही महिन्यानंतर तुम्हाला तुमच्या मासिक पाळीच्या चक्राचा आराखडा कळतो इतकेच नाही तर त्यावरून  तुम्ही प्रसूतीची अंदाजे तारीखही काढू शकता.

 

तुमच्या अंडरगारमेन्ट्सची तपासणी करा :-



 सर्व्हायकल(गर्भाशय मुखातील स्राव) म्युकसचे प्रमाण आणि रंग यावरूनही हे संकेत मिळतात. पाळी संपल्यानंतर दिवस पुढे जातील त्याबरोबर या म्युकसचे प्रमाणही वाढते. ते बोटात धरले तर चिकट लागून त्याचा तार तुटतो. ओव्ह्यूलेशनच्या दरम्यान हा स्त्राव पहिल्यापेक्षा अधिक पातळ, स्वच्छ आणि निसरडा होतो. त्याला तुम्ही बोटात धरून काही वेळ तार तोडू शकता. यावरूनही आता तुम्ही गर्भ धारणेसाठी सम्बंध ठेवायला हवे, असा संकेत मिळतो ओव्यूलेशनच्या नंतर योनी कोरडी होते आणि हा स्त्राव घट्ट होतो. सर्व्हायकलची अवस्था आणि बॉडी टेंपरेचरच्या सहाय्याने तुम्ही ओव्ह्यूलेशनची नेमकी तारीख माहीत करून घेऊ शकता.

 

सर्व्हिक्सची (गर्भाशय मुखाची) अवस्था :-





सर्व्हिक्सच्या अवस्थेवरूनही तुम्ही ओव्ह्यूलेशनचा योग्य अंदाज करू शकता. पाळीच्या सुरुवातीला योनी आणि गर्भाशय यातील मार्ग थोडा ताणलेला असतो तर नंतर तो बंद होतो, पण ओव्यूलेशन नंतर त्याची अवस्था कळू शकते.

 

ओटीपोटातील वेदनेकडे लक्ष द्या :-



 तुमचे शरीर आपण होऊन ओव्ह्यूलेशनचे  संकेत देत असते. या काळात पोटाच्या खालच्या भागात वेदना किवा अखडल्यासारखे होते. यावरून ओव्हरीमधून अंडी बाहेर पडत असल्याचे कळते.

 

 लघवीची तपासणी :-



बाजारात आता 'ओव्ह्यूलेशन प्रिडिक्टर' ची कीटही मिळते. यातील हार्मोन्सच्या तपासणीवरून ओव्ह्यूलेशनची नेमकी तारीख कळू शकते. तुम्हाला तुमच्या लघवीत ही काडी बुडवून ही तपासणी करावी लागते

 

तुमच्या घड्याळीवर लक्ष ठेवा :-



आता असे एक यंत्र तायर झाले आहे, जे तुम्ही घड्याळीसारखे हाताला बांधू शकता. ते तुमच्या घामातील क्लोराईड, पोटॅशियम आणि सोडियमच्या प्रमाणावर लक्ष ठेवीत असते, जे दरमहा बदलत असते. ही क्लोराईडीन टेस्ट चार दिवस आधी तुम्हाला ओव्ह्यूलेशनची माहिती देऊ शकते. हाताला बांधावे लागते. योग्य निर्णयासाठी हे यंत्र तुम्हाला सहा तास सलग हाताला बांधावे लागते.

 

थुंकीची तपासणी :-



तुमच्या स्लाईव्हा टेस्टमधील ॲस्ट्रोजनच्या प्रमाणावरूनही ओव्ह्यूलेशन होणार असल्याची माहिती मिळते. या तपासणीवरून मोठ्या प्रमाणात खात्री पटते. 'पी ऑन स्टिक' पेक्षा ही तपासणी किफायतशीर आहे.


डॉ. भूषण काळे                                                                                 डॉ .स्मिता काळे 

  एम एस (प्रसूती व स्त्री रोग )                                                                  एम डी (पंचकर्म ) केरळ

                       आयुभूषण आयुर्वेदिक वंध्यत्व निवारण आणि केरळीय पंचकर्म चिकित्सालय

                             (वंध्यत्व, स्त्रीरोग, गर्भसंस्कार, सुवर्णप्राशन, केरळीय पंचकर्म)

                                                                        8888511522

 

गर्भसंस्कार - 

आई होताना घ्यावयाची पावले 

 

....गर्भधारणेपूर्वी....

(क्रमशः)

 

भावी पित्यासाठी काही सूचना

 

एक वडील म्हणून तुम्हाला आतापासूनच एक वेगळी रूम बांधण्याची आवश्यकता नसली तरीही तुम्ही या सर्व प्रक्रियेत सहकार्य करायला हवे. (एकटी आई काय - काय करे?) या सल्ल्यांच्या मदतीने ही प्रक्रिया आणखी सोपी व्हायला मदत होते.

 

डॉक्टरांना भेटा :-



खरं तर तुम्हाला काही गर्भधारणा करायची नाही, तरीही तुमच्या डॉक्टरांना भेटून तपासणी करून घ्या. दोन निरोगी शरीराच्या मिलनातूनच एक निरोगी बाळ जन्माला येऊ शकते. परिपूर्ण तपासणी केल्यानंतरच तुम्हाला टेस्टिकूलर सिस्ट किंवा ट्यूमर सारख्या आजारांना बळी पडलेले नाहीत ना? अथवा निराशेसारखा मानसिक आजार तुमच्या वडील बनण्याच्या मार्गातील अडकाठी बनत नाही ना? लैंगिक परिणाम, हर्बल औषधी आणि स्पर्म काऊंट याची डॉक्टरांकडून माहिती करून घ्या. या सर्व बाबींची माहिती मिळविल्यानंतरच तुम्हा एका निरोगी बाळाचे वडील बनू शकता.

 

आवश्यकता असेल तर जेनेटिक स्क्रिनिंग (गुणसूत्रांची तपासणी) :-



तुमच्या कुटुंबात कोणाला अनुवांशिक आजार असेल आणि तुमच्या जोडीदाराची हे टेस्ट केली जात असेल तर तुम्हीही ही तपासणी आवश्य करून घ्या.

 

आहारातील सुधारणा :-



पोषण जितके चांगले असते तितके स्पर्म जास्त शक्तीशाली असतात. तुम्ही ताजी फळे, हिरव्या भाज्या, कडधान्ये आणि प्रोटिनयुक्त संतुलित आहार घ्यायला हवा. या काळात तुम्ही मिनरल आणि जीवनसत्त्वांचा डोसही घेऊ शकता कारण फक्त आहारातून सर्व घट मिळण्याची शक्यता नसते. यात फॉलिक अॅसिडचाही समावेश करा. अनेक वेळा या तत्त्वाच्या अभावी गर्भधारणेला वेळ लागू शकतो आणि बाळात काही जन्मजात विकृतीही निर्माण होऊ शकतात.

 

जीवनशैलीवर एक दृष्टिक्षेप :- 



खरं तर या विषयावर अजून संशोधन व्हायचे आहे, पण तरीही इतके तर नक्की आहे, की तुम्ही ड्रग्ज घेत असाल किंवा मोठ्या प्रमाणात अल्कोहोलचे (मध्यपान) सेवन करीत असाल तर तुम्ही सहजा सहजी वडील होऊ शकणार नाहीत. यामुळे स्पर्म कमी होतात असे नाही तर त्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात कमी होतात. शिवाय टेस्टोस्टेरॉनची पातळीही कमी होते. हे योग्य नाही. मोठ्या प्रमाणात मद्यपान केल्याने बाळाचे वजन कमी होते. तुम्ही मद्यपान कमी केले तर तुमच्या जोडीदारासाठीही असे करणे शक्य होते. तुम्ही मद्यपान आणि ड्रग्ज सोडू शकत नसाल तर डॉक्टरांची मदत घ्या.

 

वजन तपासणी :- 



ज्या पुरूषांचा बॉडी मास इंडेक्स अधिक असतो, ते पुरूष सर्वसाधारण पुरूषांच्या तुलनेत नंपुसक असतात. तुमच्या वजनातील ९ कि ग्रां. इतका वाढही हा परिणाम करू शकते, त्यामुळे गर्भधारणेला सुरूवात करण्याआधी तुमच्य वजनाची तपासणी करा.

 

धुम्रपान सोडा :- 



आता इथे काहीही बहाणे चालणार नाहीत. धुम्रपानामुळे स्पर्मची संख्या कमी होते त्यामुळे हे सोडणे तुमच्या कुटुंबासाठी आरोग्यदायी असते. तिच्यासाठीही तुमच्या सिगारेटचा धूर कमी धोकादायक नाही. त्यामुळे तुमचे बाळही एस आय डी एस (अचानक संक्रमित आजाराने मृत्यू) पासून वाचू शकते.

 

रसायनांपासून दूर रहा :- 



रंग, डिंक, वॉर्निश यासारख्या तीव्र रसायनांशी थेट संपर्क येण्यापासून दूर रहा. यामुळेही तुम्ही अडचणीत येऊ शकता.

 

जनानांगाचा भाग थंड ठेवा :- 



वृषणाचे तापमान आवश्यकतेपेक्षा जास्त असेल तर त्याचा परिणाम स्पर्मच्या उत्पादनावर होतो. शरीराच्या तापमानापेक्षा वृषणाचे तापमान कमी असते, त्यामुळेच ते शरीराला बाहेरच्या बाजूने लटकत असतात. हॉट टब बाथ, सोना, इलेक्ट्रिक केबल आणि टाईट जिन्सपासून तुम्ही दूर रहा. सिंथेटिक धाग्याची पँट किंवा अंडरवेअर घालू नका. यामुळे शरीराच्या खालच्या भागाचे तापमान वाढू शकते. लॅपटॉपचा वापर करायचाच असेल तर डेस्कटॉप प्रमाणे करा.

 

जननेंद्रियाची सुरक्षितता :- 



तुम्ही एखादा रफ गेम (फूटबॉल, सॉकर, बास्केट बॉल, हॉकी, बेसबॉल, घोडेस्वारी इ.) खेळत असाल तर रक्षक गार्ड वापरून आपल्या जननेंद्रियाची सुरक्षा करा. जास्त सायकल चालविल्यामुळेही परेशानी होऊ शकतो. काही तज्ज्ञांचे मत तर असे आहे, की सायकलच्या सिटचा दाब पडल्यामुळे अनेक धमन्यांचे नुकसान होते. जननेंद्रियाला मुंग्या येत असतील आणि ते सुन्न पडत असतील तर डॉक्टरांना दाखवा.

 

विश्रांती :- 



होय, आता तुम्हाला सर्व काही माहीत झाले आहे, आता त्यावर शांत चित्ताने अमंलबजावणी करा. या घाई गडबडीत विश्रांती घ्यायला विसरू नका. तणावामुळे तुमच्या कामगिरीची पातळी खालावू शकते आणि स्पर्म निर्मितीत अडचण येऊ शकते. जितकी कमी काळजी कराल तितके चांगले परिणाम झालेले आढळून येतील. शांत चित्ताने प्रयत्न करीत रहा.


  डॉ. भूषण काळे                                                                                 डॉ .स्मिता काळे 

  एम एस (प्रसूती व स्त्री रोग )                                                                  एम डी (पंचकर्म ) केरळ

                       आयुभूषण आयुर्वेदिक वंध्यत्व निवारण आणि केरळीय पंचकर्म चिकित्सालय

                             (वंध्यत्व, स्त्रीरोग, गर्भसंस्कार, सुवर्णप्राशन, केरळीय पंचकर्म)

                                                                        8888511522