मनःशांती आणि मेंदूची कार्यक्षमता वाढवण्यासाठी आयुर्वेदिक घरगुती उपाय...!
"सिर शांत तर मन प्रसन्न!" – आयुर्वेदाचं हे सुंदर तत्त्वज्ञान आपल्याला मानसिक आरोग्य टिकवण्याची दिशा दाखवतं. आजच्या धावपळीच्या जीवनात मानसिक तणाव, थकवा आणि एकाग्रतेचा अभाव सामान्य झाला आहे. पण त्यावर घरगुती आणि नैसर्गिक उपाय नक्कीच आहेत. १. ब्राम्ही किंवा शंखपुष्पीचा नियमित वापर करा
ब्राम्ही आणि शंखपुष्पी या आयुर्वेदिक औषधी वनस्पती मेंदूचे आरोग्य सुधारण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहेत.
✅ स्मरणशक्ती वाढवतात
✅ तणाव, चिंता कमी करतात
✅ मेंदू शांत आणि स्थिर ठेवतात
कसं घ्यावं?
– ब्राम्हीचा काढा, गोळ्या किंवा ब्राम्ही-घृत (तूप) स्वरूपात घेता येतो
– रोज सकाळी रिकाम्या पोटी १-२ चमचे ब्राम्ही-घृत घेतल्यास एकाग्रता वाढते
२. नस्य – नाकात तेल टाकण्याची आयुर्वेदिक पद्धत
नस्य म्हणजे नाकात औषधी तेल टाकणे. यासाठी अनुतैल हा आयुर्वेदात सांगितलेला खास तेल प्रकार आहे.
✅ मेंदूचं आरोग्य सुधारतो
✅ डोकेदुखी, जडपणा, मानसिक थकवा कमी होतो
✅ झोप चांगली लागते
कसं करावं?
– झोपण्यापूर्वी नाकात २-३ थेंब अनुतैल टाकावं
– पाठीवर झोपून काही मिनिटं विश्रांती घ्यावी
३. तुलसी आणि आलेची चहा प्या
तुळस आणि आल्याची चहा हे नैसर्गिक द्रव्य मानसिक आणि शारीरिक थकवा दूर करतं.
✅ मूड फ्रेश होतो
✅ थकवा कमी होतो
✅ शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात
कधी पिऊ शकता?
– सकाळी उठल्यावर
– तणाव, थकवा वाटत असताना
इतर महत्त्वाचे आयुर्वेदिक सल्ले:
✅ ७–८ तासांची शांत झोप घ्या – झोपेचा अभाव म्हणजे तणावाला आमंत्रण
✅ दररोज १०–१५ मिनिटं तरी उन्हात किंवा मोकळ्या हवेत चालत जा
✅ स्क्रीन टाइम कमी करा – दर २ तासांनी डोळ्यांना आराम द्या
✅ ध्यान व प्राणायाम रोजच्या दिनचर्येत समाविष्ट करा
✅ मोबाईलपासून ब्रेक घ्या – मानसिक विश्रांतीसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे
निष्कर्ष:
आपण मानसिक आरोग्य आणि मेंदूची कार्यक्षमता वाढवण्यासाठी महागड्या गोष्टी करण्याची गरज नाही. आपल्या स्वयंपाकघरात आणि आयुर्वेदात अशा कितीतरी उपायांचा खजिना आहे.
Dr. Bhushan Kale.
Dr. Smeeta Kale.
Contact - 9665351355
- 8888511522